। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील डिकसळ येथे असलेल्या शारदा इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये पोलीस मित्र संघटनेच्यावतीने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी शाळेतील 252 विद्यार्थी आणि 13 शिक्षक यांची नेत्र तपासणी करण्यात आली.
शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल डिकसल तसेच पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली संघटनेच्यावतीने शालेय विद्यार्थी यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. पोलीस मित्र संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे आणि शाळेचे संस्थापक अध्यक्ष सूरज ठाकूर यांचे हस्ते नेत्र चिकित्सा शिबिराचे उदघाटन झाले. या शाळेच्या मुख्याध्यापिका किरण ठाकूर, प्रदेश कमिटी अध्यक्ष रतन लोंगले जिल्हा युवक अध्यक्ष प्रफुल जाधव डॉ विशाल बनसोडे व सहकारी हेल्थ अडवायझर डॉक्टर संजय सिंग उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांची डोळे तपासणी, बी.एम.आय, आय ब्ल्यंड नेस, वजन, अशा विविध तपासण्या करण्यात आल्या. शारदा इंग्लिश स्कूलमधील 252 विद्यार्थी व 13 शिक्षक तसेच इतर कर्मचाऱ्यांनीदेखील मोठ्या संख्येने सहभाग घेतला.