। अलिबाग । प्रतिनिधी ।
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या अलिबाग शाखेचा 26 वा वर्धापनदिन सोमवारी (दि.7) साजरा कऱण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त लायन्स क्लब अलिबाग यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आदर्श पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजीत पाटील, आदर्श पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील, अनंत म्हात्रे, सतीश प्रधान, भगवान वेटकोळी, विलाप सरतांडेल, जगदीश पाटील, प्रकाश देशमुख, मनोज ढगे,परेश भटेजा, विराज ढगे, कल्पेश थळे आदी उपस्थित होते.
या नेत्र तपासणी शिबिरात 110 रुग्णाची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. त्यातील 15 जणांच्या डोळ्यात मोतिबिंदू आढळून आले. या 15 जणांच्या डोळ्यांवर आदर्श पतसंस्थेतर्फे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. आदर्श पतसंस्था नेहमीच अशा प्रकारची मोफत नेत्र शिबिरे लायन्स क्लब अलिबाग यांच्या मार्फत घेत असते. आजपर्यंत या माध्यमातून संस्थेने जवळपास 600 रुग्णांवर शस्त्रक्रिया करून त्यांना दृष्टी दिली आहे, अशी माहिती आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी दिली.