। कोर्लई । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यातील खारआंबोली येथील रहिवासी संदीप ठाकूर यांच्या घरामध्ये पाचफुटी साप आढळून आला होता. त्यांनी तातडीने वनविभागाचे वनपाल किरण गायकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सर्पमित्र संदीप यांना माहिती दिली. संदीप घरत यांनी तात्काळ खारआंबोली येथील संदीप ठाकूर यांच्या घरी येऊन पाचफुटी नागाला आपल्या कौशल्याने पकडून वनअधिकारी मनोज वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक किरण गायकर यांच्या सहकार्याने जवळील जंगलात सुरक्षितपणे सोडून जिवदान दिले आहे.






