। नागोठणे । वार्ताहर ।
इंजिनिअरिंगच्या प्रत्येक विद्यार्थ्याने भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या वेलशेत येथील विद्या संकुलातील फायर अँड सेफ्टीच्या उपलब्ध कोर्सच्या संधीचा फायदा घेतला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थी फायर आणि सेफ्टीचे शिक्षण घेऊनच बाहेर पडणे गरजेचे आहे. आपल्या संस्थेने 2009 रोजी सुरु केलेल्या फायर आणि सेफ्टी कोर्समुळे आज काही विद्यार्थी परदेशात गेले आहेत. तर, काहींना नोकरीत बढती मिळाली आहे. म्हणूनच इंजीनियरिंगमध्ये केवळ स्वतःची प्रगती न बघता इंजिनीअरिंग बरोबरच फायर आणि सेफ्टी कोर्स पूर्ण करणे ही इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी काळाची गरज असल्याचे मत भाएसोचे अध्यक्ष किशोर जैन यांनी व्यक्त केले आहे.
नागोठण्यातील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या वेलशेत येथील विद्यासंकुलातील डिप्लोमा इंजिनीरिंग कॉलेज मध्ये फायर अँड सेफ्टी सेवा सप्ताह 2024 निमित्ताने सुप्रीम पेट्रोकेमिकल्स, आमडोशी -नागोठणे यांच्या सहकार्याने मार्गदर्शन व प्रात्यक्षिक शिबिराचे आयोजन आले होते. यावेळी किशोर जैन बोलत होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सुप्रीम पेट्रोकेमिकल हेल्थ अँड सेफ्टी विभागाचे प्रमुख एस.पी.यादव, संजय सोनावणे, प्रकाश जैन, विवेक सुभेकर, अनिल गिते, दीपक गायकवाड आदींसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.