। कोर्लई । वार्ताहर ।
नेव्ही सिव्हिलयन इंडस्ट्रीयल स्टाफ नरेश सुदाम भाटकर हे तीस वर्षाहून अधिकची उत्कृष्ट सेवा नेव्हल ऑर्गनायझेशनला देत सन्मानपूर्वक नुकतेच सेवानिवृत्त झाले आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील सायगाव – काळींजे गावातील नरेश भाटकर सन 1990 पासून नेव्हल ऑर्गनायझेशन मधील टाईम किपिंग सेक्शन मध्ये कार्यरत होते. अत्यावश्यक वेळेत आपल्या सेक्शन व्यतिरिक्त इतर विभागाच्या कामकाजाला देखील ते आवर्जून हातभार लावत असत. नरेश भाटकर यांचा स्वभाव कष्टाळू, मेहनती, प्रेमळ व मनमिळावू असल्यामुळे कामाच्या ठिकाणी अनेकांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध बनले. त्यांच्या उल्लेखनीय व वैशिष्ट्यपूर्ण कामाची दखल घेत अनेक प्रशस्तिपत्र व अॅवार्ड त्यांना त्यांच्या सेवाकाळात मिळाले आहेत. वरिष्ठ सहकारी मिनिस्ट्रियल स्टाफ रंजन आणि सर्व फोरमन, कर्मचारी, कामगारवर्ग व सामाजिक कार्यकर्ते, लेखक संजय साळगांवकर यांनी नरेश भाटकर यांना भावपूर्ण निरोप देऊन पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.