। उरण । वार्ताहर ।
कोकण ज्ञानपीठ उरण महाविद्यालयातील ‘अ’ जीवन अध्ययन, निरंतर शिक्षण विभाग व गोपाल कृष्ण वाचनालय देऊळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष के.ए. शामा हे होते. विद्यार्थ्यांनी योग्य पुस्तकांची निवड करून वाचन केले पाहिजे व आपले व्यक्तिमत्त्व समृद्ध केले पाहिजे असे त्यांनी सांगितले. जिजा घरत यांनी स्वतःच्या जीवनातील संघर्ष सांगून वाचनामुळे यशस्वी झाल्याचे सांगितले. तर, ग्रंथपाल शाम धारासुरकर यांनी ग्रंथालयाचे प्रकार सांगून महाविद्यालयाच्या ग्रंथालयाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी वृषाली पाठारे, डॉ. एम.जी. लोणे व महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.