। पालघर । प्रतिनिधी ।
वसईतून अपहरण झालेल्या 3 वर्षांच्या चिमुकल्याची वालीव पोलिसांनी अवघ्या 4 तासात वेगाने तपास करून सुखरूप सुटका केली आहे. प्रेमसंबंधात चिमुकल्याच्या पालकांचा अडथळा येत असल्याने त्यांना धडा शिकविण्यासाठी एका तरूणीने हे अपहरण केले होते. ही तरुणी टिव्ही मालिकेत अभिनेत्री म्हणून काम करते. वसई पूर्वेच्या गावराई पाडा येथे दिनेश (34) हा पत्नी आणि 3 मुलांसह रहातो. शनिवारी नेहमीप्रमाणे दिनेश यांचा 3 वर्षांचा मुलगा प्रिन्स शाळेत गेला होता. त्यावेळी एक तरुणी शाळेत आली. प्रिन्सला औषध द्यायचे आहे आणि त्याला आईने घरी बोलावले असल्याची थाप तिने मारली. ही तरुणी प्रिन्सला शाळेतून घेऊन फरार झाली. काही वेळेतच हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात आला. याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.