• Login
Monday, March 30, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

विधानसभा निवडणूकीसाठी 6 उमेदवारांची नावे जाहीर

Krushival by Krushival
October 22, 2024
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
विधानसभा निवडणूकीसाठी 6 उमेदवारांची नावे जाहीर
0
SHARES
652
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अलिबागसह, पेण, पनवेल, उरण, सांगोला, कंधार मतदारसंघाचा समावेश

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग विधानसभा मतदार संघातून अनेक आमदार निवडून गेले. त्यांनी विधानसभेसह संपुर्ण महाराष्ट्रात अलिबागची शान कायम टीकून ठेवली. त्यांनी जनतेची मान उंचावेल, असे कार्य केले आहे. सध्याच्या आमदारांनी कधी सभागृहात जनतेचे प्रश्‍न मांडले का, असा सवाल उपस्थित करीत त्या आमदाराला मतेदेखील मागण्याच अधिकार नाही, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. तसेच आपली गेलेली आमदारकी या निवडणुकीत खेचून आणायची आहे. सुशिक्षीत व सर्व क्षेत्रात चांगले काम करणार्‍या उमेदवारांना आपण संधी दिली आहे. उद्याची निवडणूक प्रचंड मतांनी निवडून आणून 1957 सालची पुनरावृत्ती करायची आहे, असे शेकाप सरचिटणीस माजी आ. जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले. तसेच अलिबाग-रोहा-मुरुड मतदारसंघात चित्रलेखा पाटील, पेणमध्ये अतुल म्हात्रे, पनवेलमध्ये माजी आ. बाळाराम पाटील, उरणमध्ये प्रीतम म्हात्रे, सांगोल्यात बाबासाहेब देशमुख व कंधारमध्ये श्यामसुंदर शिंदे या उमेदवारांची नावे जाहिर केली.
अलिबाग विधानसभा मतदार संघातील निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शेकाप नेते जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि.22) सायंकाळी भव्य सभा आयोजित करण्यात आली. यावेळी जयंत पाटील बोलत होते.

यावेळी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अ‍ॅड. मानसी म्हात्रे, माजी आ. बाळाराम पाटील, प्रा. एस.व्ही जाधव, राजेंद्र कोरडे, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप राज्य कामगार आघाडीचे प्रमुख प्रदिप नाईक, रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा तथा अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, रायगड जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या उपाध्यक्षा वृषाली ठोसर, शेकाप राज्य विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा साम्या कोरडे, पेण विधानसभा मतदार संघातील उमेदवार अतूल म्हात्रे, उरणचे विधानसभा मतदार संघातील उमेदवार प्रीतम म्हात्रे, अ‍ॅड. नीलम हजारे, अ‍ॅड. अशिष रानडे, अशोक प्रधान, संजना कीर, वैशाली पाटील, सतिश प्रधान, द्वारकानाथ नाईक, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, नागेश कुलकर्णी, उरणच्या सीमा घरत, जिल्ह्यातील शेकाप चिटणीस मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, तालुका चिटणीस मंडळाचे पदाधिकारी, सदस्य,नगरपरिषद, जिल्हा परिषद ग्रामपंचायत व आदी विविध क्षेत्रातील आजी माजी पदाधिकारी, सभासद, शेकाप महिला आघाडीच्या पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, महिला, तरुण वर्ग हजारोच्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शेकाप सरचिटणीस जयंत पाटील म्हणाले की, विधानसभेमध्ये अलिबागच्या आमदारांची एक वेगळी प्रतिमा होती. एक वेगळा दबदबा होता. परंतु टक्केवारी घेणार्‍या आमदारांमुळे आपल्या अलिबागचे नाव बदनाम झाले आहे. त्यामुळे आपल्याला एक वेगळा बदल घडवून आणायाचा आहे. त्यामुळे ही निवडणूक एक वेगळ्या भुमिकेची असणार आहे. चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून अलिबाग, मुरूड व रोहा तालुक्यात महिला संवाद मेळावे घेतले. या मेळाव्यातून कार्यकर्ते, महिलांना एक वेगळी उर्जा मिळाली आहे. सर्वांची उमेद, हिंम्मत वाढविण्याचे काम मेळाव्याने केले आहे. कार्यकर्त्यांनी जोमाने काम करून चित्रलेखा पाटील यांच्या रुपाने आपला आमदार विधानसभेत पाठविण्यासाठी कामाला लागले पाहिजे. ही निवडणूकी शेतकरी कामगार पक्षाच्या अस्तित्वाची आहे. या निवडणुकीकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणूकीत अमुलाग्र बदल करायचा आहे. सर्व शक्तीनिशी आपण उतरायचे आहे. पक्षाच्या जडणघडणीत जुन्या कार्यकर्त्यांचा वाटा मोलाचा राहिला आहे. त्यांनाही बरोबर घेऊन आपण काम करायचे आहे.

पुढे ते म्हणाले, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. विधिमंडळात प्रश्‍न मांडण्याची वैभवशाली आमदारकीची परंपरा ठेवली होती. पुन्हा वेगळ्या उमेदीने काम करून आपली आमदारकी खेचून आणायची आहे. त्यापध्दतीने कार्यकर्त्यांनी कामाला लागा. प्रचंड मतांनी आपले उमेदवार निवडून आले पाहिजे. या भूमिकेतून कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन आपले विचार मतदारांपर्यंत पोहचविण्याचे काम करावे. शेकापचे चिन्ह आपले उमेदवार यांची माहिती घराघरात पोहचवून या निवडणूकीत भरघोस मतांनी आपल्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी कार्यर्त्यांनी सज्ज व्हावे. पुढील 25 वर्षे विरोधकांची आमदारकी घेण्याची हिम्मत होता कामा नये. चित्रलेखा पाटील या सुशिक्षीत असून सर्व क्षेत्रात त्यांचे काम कौतूकास्पद आहे. या निवडणूकीत वेगळी यंत्रणा उभी करून अमूलाग्र बदल करायचा आहे. ज्या पध्दतीने शेकाप गोरगरीबांसाठी लढला. त्यांना न्याय दिला. त्या पध्दतीने विचार घेत पुन्हा आपण वेगळ्या उमेदीने कामाला लागायचे आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

अलिबाग, पेण, पनवेल उरण मतदार संघातील उमेदवारी जाहीर
अलिबागमध्ये चित्रलेखा पाटील, पेणमध्ये अतूल म्हात्रे, उरणमध्ये प्रितम म्हात्रे यांच्याबरोबरच पनवेलमध्ये बाळाराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शेकाप नेते जयंत पाटील यांनी सभेमध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी जाहीर केल्यावर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. गाण्यांच्या व बेंजोच्या ठेक्यावर अनेकांनी नृत्य करीत हा उत्सव साजरा केला.

गुलाल उधळवण्याची भीष्म प्रतिज्ञा करा - अ‍ॅड. मानसी म्हात्रे,
रायगडातून लाल वादळ विधानसभेत येत आहे, हा निरोप या सभेतून महाराष्ट्राला पोहचवा. हिम्मत असेल तर लाल वादळाला अडवून दाखवा असा इशारा अ‍ॅड. मानसी म्हात्रे यांनी देत पुढे म्हणाल्या, शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारा शेतकरी कामगार पक्षाला 75 वर्षाचा वारसा आहे. विधानसभा निवडणूकीकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.लडेंगे और जितेंगे या भूमिकेतून काम करून येत्या 23 नोव्हेंबरला गुलाल उधळवण्याची भीष्म प्रतिज्ञा करा असे आवाहन शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अ‍ॅड. मानसी म्हात्रे यांनी केले.
अलिबागमध्ये चित्रलेखा पाटील यांचे नाव जाहिर
कोरोना असो की निसर्ग, तौक्ते वादळ असो प्रत्येक संकटात जीवाची तमा न बाळगता चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी काम केले. महिला म्हणून बुरसटलेल्या विचारांमध्ये न गुरफटता एखाद्या पुरुषालाही लाजवेल असं त्यांचं काम अहोरात्र सुरु होतं. या संकटावर मात करण्यासाठी त्यांनी केलेल्या योजना आणि राजकीय वैशिष्ट्यांचे रायगडकरांसह विरोधकांनीही कौतुक केलं.
कोरोनाच्या कालावधीत नागरिकांनी आरोग्यविषयक काळजी घ्यावी, सरकारी नियमांचे पालन करावे, यासाठी त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती केली. नागरिकांना आरोग्य सुरक्षिततेसंबंधी आवाहन केले. शिवाय, ठिकठिकाणच्या गरजू लोकांना धान्य वाटप केले. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत गावात सॅनिटायझेशन केले. गरजूंसाठी कोव्हिड सेंटर उभारले. तर, पुरासारख्या आपत्तीच्या कालावधीत अनेकांना मदतीचा हात दिला. पूरग्रस्तांना मदत केली. ग्रामीण भागातील मुलांना संगणक शिक्षण मिळावे म्हणून अनेक शाळांना कॉम्प्युटर भेट दिले. तर, तळागाळातील मुलींना शिक्षणाचे महाद्वार खुले व्हावे, याकरिता हजारो सायकलींचे वाटप केले. अशी एक ना अनेक समाजकार्य त्यांनी केली. अलिबाग-रोहा-मुरुड मतदारसंघात गेल्या पाच वर्षात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत शेतकरी कामगार पक्षाने चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी जाहिर केली आहे. त्यांचे नाव जाहिर होताच हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात विजयी घोषणाबाजी केली.
कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष
अलिबाग विधानसभा मतदारसंघातील शेकापचे उमेदवार कोण असणार याची उत्कंठा शिगेला पोहचली होती. अखेर ही उत्कंठा मंगळवारी संपली. शेकापच्या जाहीर सभेत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शेकापचे नेते जयंत पाटील यांनी चित्रलेखा पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. चित्रलेखा पाटील यांचे विधानसभा मतदार संघातील उमेदवारीसाठी नाव जाहीर होताच फटक्यांची आतषबाजी झाली. कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत चिऊ ताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, असा जयघोष करण्यात आला. कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह निर्माण झाला.
अलिबाग झाले शेकापमय
अलिबाग विधानसभा मतदार संघातील निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर शेकापचे सरचिटणीस माजी. आ. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सायंकाळी शेकाप भवनसमोर भव्य सभेचे आयोजन करण्यात आले. शेकापच्या अधिकृत उमेदवाराची घोषणादेखील करण्यात येणार होती. त्यामुळे अलिबाग, मुरूड व रोहा तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते दुपारी तीन वाजल्यापासून शेकाप भवन समोर हळूहळू जमू लागले. बोलता बोलता चार वाजेपर्यंत संपुर्ण परिसर कार्यकर्त्यांनी फुलून गेला. काहींच्या हातात लाल बावटा, काहींनी लाल टी शर्ट, शर्ट परिधान केला. त्यामुळे संपूर्ण अलिबाग शहर शेकापमय झाल्याचे दिसून आले. सुमारे 25 हजारहून अधिक कार्यकर्ते या मेळाव्यामध्ये सहभागी झाले होते. महिला, तरुण ज्येष्ठ कार्यकर्त्यांनीदेखील स्वयंस्फुर्तीने या मेळाव्यात सहभाग घेऊन आनंदोत्सव साजरा केला.
मतदारसंघात लाल वादळ
शेतकरी कामगार पक्षाची सभा दुपारी तीन वाजता असल्याने दुपारी बारा वाजल्यापासून कार्यकर्ते अलिबागला येण्यास सुरुवात झाली. काही कार्यकर्ते दुचाकीवर तर काही कार्यकर्ते टेमो, सितारा व चार चाकी वाहनातून निघाले. शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो असा जयघोष प्रत्येकजण करत होते. दुचाकीसह सर्वच गाड्यांवर शेकापचा लाल बावटा रुबाबात डौलत होता. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास शेकाप भवन परिसर लाल वादळाने घोंघावला. शेकापचे नेते जयंत पाटीलयांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. एक वेगळा आनंद कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला.

Related

Tags: alibag newschitralekha patilindiajayant patilkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadskpskp newssocial media newssocial news
Previous Post

उरणमध्ये भाजपला धक्का

Next Post

उरण पूर्व भागावर टंचाईचे सावट

Krushival

Krushival

Related Posts

विना हेल्मेट प्रवास जीवघेणा
sliderhome

विना हेल्मेट प्रवास जीवघेणा

March 30, 2026
महसूल विभागाची चुक; वृद्ध महिलेची फसवणूक
sliderhome

महसूल विभागाची चुक; वृद्ध महिलेची फसवणूक

March 30, 2026
अटल सेतू थेट अलिबागला जोडणार
sliderhome

अटल सेतू थेट अलिबागला जोडणार

March 30, 2026
अलिबाग नगरपरिषदे तर्फे विविध कामांचे उद्घाटन अन लोकार्पण
sliderhome

अलिबाग नगरपरिषदे तर्फे विविध कामांचे उद्घाटन अन लोकार्पण

March 30, 2026
नेरळ जलजीवन योजना संकटात
sliderhome

नेरळ जलजीवन योजना संकटात

March 30, 2026
सेलिब्रेशन रिसॉर्ट कुंटणखाना प्रकरणी आणखी चारजण ताब्यात
sliderhome

सेलिब्रेशन रिसॉर्ट कुंटणखाना प्रकरणी आणखी चारजण ताब्यात

March 30, 2026
Next Post
ग्रामीण रायगडात जलजीवन मिशन प्रभावी

उरण पूर्व भागावर टंचाईचे सावट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?