। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगावच्या द.ग. तटकरे महाविद्यालयातील आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी (दि.24)निवडणूक साक्षरता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विधानसभा निवडणूकांच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक साक्षरता आणि मोठ्या प्रमाणात मतदान व्हावे यासाठी निवडणूक साक्षरता शपथ देण्यात आली. यावेळी डॉ. बी.एम. खामकर, डॉ. राजेंद्र आचार्य, डॉ. जे.आ. पांडे, केकाणे, वृषाली सालस्कर, मेहरीन डावरे, आदिल, श्वेता आदी उपस्थित होते.