पक्षी गणना कार्यक्रमाचे आयोजन
। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।
पक्षी निरीक्षक आणि निसर्गप्रेमींसाठी एक अनोखी संधी फणसाड वन्यजीव अभयारण्यात आयोजित करण्यात आली आहे. या तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन 25 ते 27 ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. ग्रीन वर्कस् ट्रस्ट आणि फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र वन विभाग ठाणे वन्यजीव विभागाच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचा उद्देश फणसाड वन्यजीव अभयारण्यातील पक्षी जीवनाचे निरीक्षण व नोंदणी करणे असुन फणसाड पक्षी गणना हे दीर्घकालीन पक्षी सर्वेक्षण फाऊंडेशनच्या कार्यक्रमांतर्गत येते. हा उपक्रम वैज्ञानिक पद्धतीने नागरिकांच्या मदतीने दि. 25 ते 27 ऑक्टोबर रोजी राबविला जाणार आहे. तरी पक्षी जीवनाचे निरीक्षण आणि नोंदणी करण्यासाठी इच्छुकांनी सहभागी होण्यासाठी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. तसेच, नोंदणीसाठी 18 वर्षांवरील व्यक्तीच अर्ज करू शकतात. या व्यक्तींना तीन दिवसांत जंगलामधून अंदाजे 25 किमी अंतर चालण्याची क्षमता असावी. सोबत स्वतःची दुर्बीण असणे आवश्यक आहे. अर्जदारांची निवड नोंदणीच्या वेळी दिलेल्या माहितीनुसार केली जाईल आणि निवड झालेल्या सहभागी व्यक्तींना ई-मेलद्वारे कळवले जाणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी होणार्या ओरिएंटेशन सेशनला निवड झालेल्यांनी उपस्थित राहणे अनिवार्य आहे, अन्यथा सहभागींची निवड रद्द केली जाईल.
अधिक माहितीसाठी ग्रीन वर्कस् ट्रस्ट (8779409460) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन वन्यजीव तज्ज्ञ डॉ. निखील भोपळे केले आहे.