। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
ब्राह्मणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ अंतर्गत राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथील कृषी पदवीच्या अंतिम वर्षातील कृषी विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी जागरुकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत नांदगाव येथे शेततळ्याचे प्रात्यक्षिक केले. यावेळी शेतकर्यांना शेततळ्याचे महत्त्व पटवून देत कृषी विद्यार्थ्यांनी शेततळे कसे बनवावे, याची माहिती दिली. या प्रात्यक्षिकामध्ये कृषी विद्यार्थी रणजित डोंबाळे, रितेश मोरे, सौरभ पाटील, गणेश भोसले, पांडुरंग मिसाळ, सौरभ पिसे, प्रज्ञेश लळीत, ऋषिकेश जाधव, बालाशिवा, शिवानागेंद्र यांचा सहभाग होता.