जिल्हाधिकार्यांचे शिक्षण अधिकार्यांना आदेश
| रत्नागिरी | प्रतिनिधी |
रत्नागिरी जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे पहिल्या टप्यातील प्रशिक्षण मागील आठवड्यात झाले. दुसर्या टप्प्यातील प्रशिक्षण 8 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत होणार असल्याच्या सूचना निवडणूक आयोगामार्फत प्राप्त झाल्यावर जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दि. 8 ते 14 नोव्हेंबरपर्यंत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी मुख्यालयी (शाळेमध्ये नाही) उपस्थित राहावे, असे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अधिकार्यांना तसे आदेश दिले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात प्राथमिक शाळांना 28 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर अशी, तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना 28 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर अशी दीपावली सुट्टी आहे. सुट्टीच्या शेवटच्या टप्प्यात, केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे दुसरे प्रशिक्षण होणार असल्याने निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांना प्रशिक्षणासंदर्भातील पत्रे देणे सुलभ जावे यासाठी मुख्यालयी थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्यात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांचे प्रशिक्षण आपापल्या विधानसभा क्षेत्रात घेण्यात आले. दुसर्या टप्प्यात होणारे प्रशिक्षण नियुक्त केलेल्या कर्मचार्यांची ड्युटी ज्या मतदारसंघात असेल, त्या ठिकाणी होणार आहे. जिल्हाधिकार्यांचे आदेश प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना प्राप्त झाल्यावर प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी प्रत्येक तालुक्याच्या गटविकास अधिकार्यांना पत्र काढले आहे.