| चिपळूण | प्रतिनिधी |
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित संजीवनी डीएमएलटी नर्सिंग कॉलेजमध्ये दि. 24 ऑक्टोबर रोजी पोलिओ दिन साजरा करण्यात आला. कॉलेजमधील जीएनएम तृतीय वर्ष विभागातील विद्यार्थ्यांनी पोलिओ रोग आणि त्यापासून बचावासाठी लसीकरणाचे महत्त्व याविषयी माहिती दिली. पोलिओ हा मज्जासंस्थेवर होणारा घातक आजार आहे. पोलिओ रोगाची जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 24 ऑक्टोबर या दिवशी जागतिक पोलिओ दिन साजरा केला जातो. यावेळी संजीवनी नर्सिंग कॉलेजच्या सेक्रेटरी हर्षा वाघुळदे, शिक्षक सोनाली सुर्वे, सुप्रिया माळी, शिक्षकेतर कर्मचारी अवंतिका जंगम, वृषाली मालप आणि मयुरी शिगवण, पायल शिगवण या सर्वांची उपस्थिती लाभली.