सिद्धेश्वर शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतली शपथ
| पाली/गोमाशी | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील राजिप शाळा सिद्धेश्वरमधील सर्व विद्यार्थ्यांनी शनिवारी (दि. 26) फटाके न वाजविण्याची शपथ घेतली. हे विद्यार्थी फटक्यांऐवजी गोष्टींची पुस्तके खरेदी करणार आहेत. तसेच आनंददायी शनिवार अंतर्गत विद्यार्थ्यांनी पर्यावरणस्नेही आकाशकंदीलसुद्धा तयार केले.
यावेळी केंद्रप्रमुख कैलास म्हात्रे, मुख्याध्यापिका रोहिणी खामकर व शिक्षक जनार्दन भिलारे, स्वप्नाली मेमाणे, प्रिया काळे उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांना फटाक्यांमुळे होणारे दुष्परिणाम व फटाकेमुक्त दिवाळीचे महत्त्व समजावून सांगितले. शाळेतल्या शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा निर्धार केला. पर्यावरण स्नेही दीपावली, फटाके मुक्त दीपावली साजरी करू. तसेच या दिवाळीत फटाके फोडणार नाही त्याऐवजी पुस्तके विकत घेऊन वाचू, अशी शपथ विद्यार्थ्यांनी घेतली. या विधायक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.