। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
तामसोली गावचे संजय कणघरे यांना त्यांच्या समाजसेवेबाबत 2020-2021 या वर्षीचा राज्यस्तरीय आदर्श युवक, महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा समारोह ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला होता. राज्यातील अनेक युवकांची या पुरस्कारामध्ये निवड झाली होती. त्यामध्ये तामसोली गावचे सुपुत्र संजय कणघरे यांची निवड झाली. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे अनेक स्तरातून अभिनंदन होत आहे.