अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील परहूरपाडा येथील विजय दशरथ पाटील यांचे हद्यविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. निधनसमयी ते 51 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, बहिण असा परिवार आहे. ते दत्तप्रसादिक भजन मंडळाचे उत्तम बुवा, विविध धार्मिक ग्रंथवाचक व गुडलक क्रिकेट संघाचे अष्ठपैलू क्रिकेटर होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजतात सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या पार्थिवावर परहूरपाडा येथील स्मशानभूमीत अत्यंतस्कार करण्यात आले. यावेळा मित्रपरिवारतर्फे तसेच पाटील, म्हात्रे, घरत, नाईक परिवाराकडून तसेच विविध क्षेत्रातील मंडळीकडून श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यांचे दिवसकार्य 20 ऑक्टोबर रोजी तर उत्तरकार्य 22 ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे कुंटुबियांकडून सांगण्यात आले.