। पुणे । प्रतिनिधी ।
हडपसर भागातील महमदवाडी परिसरात दहावीतील विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. दोन दिवसानंतर दहावीची पूर्वपरीक्षा सुरू होणार असल्याने अभ्यासाच्या ताणामुळे तिने आत्महत्या केली असल्याची माहिती मिळाली आहे.
रेहा प्रशांत वर्गीस असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून ती इयत्ता दहावीमध्ये शिकत होती. दोन दिवसानंतर पूर्वपरीक्षा सुरू होणार होती. शुक्रवारी (दि. 08) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घरात कोणीही नसताना पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. हि घटना उघडकीस येताच कुटुंबीयांनी तात्काळ तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी केली असता दोन दिवसानंतर दहावीची पूर्वपरीक्षा सुरू होणार असल्याने अभ्यासाच्या ताणामुळे तिने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.