विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे बल्लारपुरात आवाहन
। बल्लारपूर । प्रतिनिधी ।
चंद्रपूर जिल्हयात एकही उद्योग आणला नाही, उलट येथे सुरु असलेले उद्योग बंद पाडले. येथील नागरिक रोजगारासाठी वणवण भटकत आहे. काहींना तर नोकरीसाठी तेलंगण राज्यात जावे लागते. अशा विकासाच्या थापा मारण्यात मुनगंटीवार आघाडीवर आहेत. त्यामुळे महायुतीला महाराष्ट्राच्या सत्तेतून पायउतार करण्याची वेळ आली आहे, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बल्लारपूर येथे आयोजित महाविकास आघडीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांच्या प्रचार सभेत सांगितले.
सभेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव के. राजू, किशोर कन्हेरे, जिल्हा बँक अध्यक्ष आणि बल्लारपूर-मूल विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत, माजी आमदार जैनुद्दिन जव्हेरी, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, डॉ. संजय घाटे, घनश्याम मुलचंदनी, डॉ. वाढई, दिलीप माकोडे, सिक्की यादव, रोशनलाल बिट्टू, गोविंद उपरे, करीमभाई शेख, राजू काबरा, बादल उराडे, मल्लेश्वरी महेशकर, याकूब पठाण, डॉ. बावणे, डॉ.कुलदीवार व अन्य उपस्थित होते.