| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
पेण येथे नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत मुरुडच्या सुविद्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळवले. विद्यालयाच्या आर्या उत्तम जैन हिने 17 वर्षांखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक जिंकले. चौदा वर्षांखालील मुलींच्या गटात खदीजा शमीम हद्दादी हिने द्वितीय क्रमांक, तर चौदा वर्षांखालील मुलांच्या गटात यासिन इब्राहीम मनियार यानेही द्वितीय क्रमांक पटकावला.
या सर्व विद्यार्थ्यांचे सुविद्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संजिदा खानजादे, विभाग प्रमुख मतीन हमदुले, क्रीडा शिक्षक साहिल अन्सारी तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.