| पनवेल | वार्ताहर |
नुकत्याच पार पडलेल्या भुसावळ येथील ऑल इंडिया राणी लक्ष्मीबाई महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या मुलींनी चमकदार कामगिरी केली आहे.
भुसावळ येथे पार पडलेल्या ऑल इडिया राणी लक्ष्मीबाई महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या मुलींनी एकूण चार महिला बॉक्सर्सने सहभाग घेतला. त्यात 2 सुवर्ण व 2 रौप्यपदकांची कमाई केली. यामध्ये पनवेलची उन्नती परदेशी (युथ, 54-57) मध्ये सुवर्णपदक, खारघरची सई कारंडे (कॉडेट, 46-48) मध्ये सुवर्णपदक, नवीन पनवेलची किरण चव्हाण (एलिट, 52-54) रौप्यपदक व पनवेलची अस्मी ठाकरे (कॉडेट, 48-50) मध्ये रौप्यपदक पटकाविले आहे. या स्पर्धेचे आयोजन माजी राष्ट्रीय विजेते बॉक्सर व सध्याचे प्रशिक्षक नरेंद्र मोरे व माजी राष्ट्रीय खेळाडू व मुंबईचे प्रशिक्षक कृष्ण सोनी यांनी केले. स्पर्धेचे उद्घाटन विश्व विजेती व ऑलिम्पिक पदक प्राप्त भारताची शान मेरी कॉम यांनी केले.