। कोलाड । वार्ताहर ।
पेण-रोहा आणि सुधागड विधानसभा मतदारसंघाचे शेकापचे उमेदवार अतुल म्हात्रे यांच्या प्रचाराला जनतेतून वाढता प्रतिसाद मिळत आहे. पेण मतदार संघात भाजप उमेदवार रविशेठ पाटील यांना भाजपने दिलेल्या आश्वासनाकडे लक्ष देत निवडून दिले होते.
मात्र, दिलेल्या आश्वासनाकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याने पेण मतदार संघात कोणत्याही विकास कामांवर सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे. भाजपवर मतदारांची नाराजी असल्याचा फायदा शेकापचे उमेदवार अतुल म्हात्रे यांना होऊ शकतो, असा अंदाच कार्यकर्त्यांना वाटत असल्याने ते अतुल म्हात्रे हे गावोगावी जाऊन गाठीभेटी घेत आघाडी घेत असल्याचे दिसून येत आहे. यावेळी अतुल म्हात्रे यांनी रोहा तालुक्यातील आंबेवाडी जिल्हा परिषद मतदार संघात, खांब आणि आंबेवाडी पंचायत समिती गणात तसेच सुतारवाडी, येरल, पहूर, कोलाड, आंबेवाडी, खांब, विठ्ठलवाडी, रजखलाटी, मेढ विभाग, मालसई, उडदवणे, देवकान्हे, चिल्हे, तळवली तर्फे अष्टमीसह सर्व भागातील गावागावांत मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या. यावेळी घरोघरी केलेल्या प्रचारात सर्व नागरिकांनी उच्च शिक्षित आणि सामाजिक बांधिलकी म्हणून अतुल म्हात्रे यांना वाढता पाठिंबा तसेच प्रतिसाद मिळत आहे.