। चाणजे । वार्ताहर ।
उरण विधानसभा मतदारसंघातील आमदार महेश बालदी यांनी पाच वर्षांत कोणतीच विकास कामे केली नाहीत. जनतेच्या समस्या, अडीअडचणी समजावून घेण्यासाठी आमदारांनी आमसभाही घेतली नाही. आमचे केंद्रात सरकार आहे ते माझ्या पाठीशी उभे असल्याने आपल्या समस्या मी चुटकी सरशी सोडविन, असे सांगून जनतेची दिशाभूल करणारे निष्क्रिय आमदार महेश बालदी यांना मतदार धडा शिकवतील, असा विश्वास आगरी, कराडी, कातकरी संस्थेचे अध्यक्ष मोरेश्वर भोईर यांनी व्यक्त केला आहे.
आमसभा घेऊन मतदारांशी संवाद साधला जातो मात्र आमदार महाशयांनी आमसभा घेतली नाही. असे मतदार बोलत असुनआमसभेद्वारे जनतेच्या समस्या, अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी विचारविनिमय करून मार्ग शोधला जातो. या सभेला सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी, वीज वितरण अधिकारी, आरोग्य अधिकारी, पाणी पुरवठा अधिकारी असे सर्व विभागीय अधिकारी असल्याने त्यांच्या सहकार्याने समस्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र असे कोणतेच कार्य झाले नाही. असे मतदार बोलत आहेत. यामुळे अशा निष्क्रियांना मतदार धडा शिकवतील असा विश्वास मोरेश्वर भोईर यांनी व्यक्त केला.