। उरण । वार्ताहर ।
यु.ई.एस. इंग्लिश मिडीयम स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अॅण्ड कॉमर्समध्ये शनिवार (दि. 23) रोजी पालक मैदान येथे वक्तृत्व (गट 1-3, इ. 1 ली ते 7 वी), एक्सटेम्पोर (गट 4, इ. 8 वी आणि 10 वी) एकल गायन (गट 1 आणि 2, इ. 1 ली ते 4 थी), एकल नृत्य (गट 3 आणि 4, इ. 5 वी ते 10 वी), चित्रकला (गट 1- 4, इ. 1 ली ते 10 वी) वादविवाद (गट 5, इ. 11 वी आणि 12 वी) आणि रांगोळी (गट 5 अ आणि ब, इ. 11 वी आणि 12 वी) असे वैविध्यपूर्ण विषय असलेली आंतरशालेय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ह्या स्पर्धेला स्कूल आणि ज्यु. कॉलेजच्या प्राचार्या, माध्यमिक, प्राथमिक व पूर्व-प्राथमिक विभागातील पर्यवेक्षिका, समन्वयक तसेच आपल्या व इतर शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
उरण तालुक्यातील एकूण 11 शाळेतील 180 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. ह्या सर्व शाळांनी आपल्या विदयार्थ्यांना ह्या स्पर्धेत पाठवून, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देऊन आत्मविश्वासही निर्माण केला. संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्कुल व ज्यु. कॉलेजच्या शिक्षिकांनी केले. अशा रितीने ही आतंरशालेय स्पर्धा यु.ई.एस. इंग्लिश मिडीयम स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अॅण्ड कॉमर्सच्या उत्तम आयोजनामुळे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.