| मुरुड | प्रतिनिधी |
मुरुड डोंगरी येथील चढावात पर्यटकांची कार पलटी झाली सुदैवाने पर्यटक सुखरूप असल्याचे समजते. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी मुंबई येथून आलेल्या पर्यटकांची कार डोंगरी चढावावर आली असताना अरुंद रस्ता व सुरक्षा भिंत नसल्याने कार रस्त्याच्या कडेला जाऊन दहा फूट खाली कोसळली व पलटी झाली. या कारमध्ये असलेले पर्यटक किरकोळ जखमी झाले आहेत. तरी संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर या डोंगरी चढावात सुरक्षा भिंत बांधावी व रस्त्याचे लवकरात लवकर रुंदीकरण करण्यात यावे अशी मागणी जनमानसातून जोर धरू लागली आहे. जेणेकरून अपघाताच्या घटना घडणार नाहीत.