। झिम्बाब्वे । वृत्तसंस्था ।
अंतर्गत बंडाळ्या आणि खराब कामगिरीच्या गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानला रविवारी आणखी एक धक्का बसला. ऑस्ट्रेलियाहून झिम्बाब्वे दौर्यावर गेलेल्या पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. बुलावेयो इथे झालेल्या पहिल्या वनडेत झिम्बाब्वेने पाकिस्तानवर 80 धावांनी खणखणीत विजय मिळवला.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. नवव्या क्रमांकावर फलंदाजी करणार्या रिचर्ड नकाराग्वाने 48 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. अनुभवी सिकंदर रझाने 6 चौकारांसह 39 धावांची खेळी केली. बाकी खेळाडूंना मोठी खेळी करण्यात अपयश आलं. पाकिस्तानतर्फे सलमान अघा आणि फैझल अक्रम यांनी प्रत्येकी 3 विकेट्स पटकावल्या. आमीर जमाल, मोहम्मद हसनैन, हारिस रौफ यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. झिम्बाब्वेच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर पाकिस्तानने शरणागती पत्करली.