। पंजाब । वृत्तसंस्था ।
आयपीएल स्पर्धेचे सर्व हंगाम खेळूनही जेतेपद पटकावू न शकलेल्या पंजाब किंग्जने लिलावात नव्याने संघबांधणी करायला घेतली आहे. रिटेन्शनमध्ये केवळ दोन खेळाडूंना रिटेन करणार्या पंजाब किंग्जने लिलावात श्रेयस अय्यरसाठी तब्बल 26.75 कोटींची बोली लावली. पंजाबला एका सक्षम कर्णधाराची गरज होती. श्रेयसच्या रुपात त्यांना चांगला कर्णधार मिळाला आहे. पंजाबने अर्शदीप सिंगसाठी राईट टू मॅचचा अधिकार वापरत त्याला ताफ्यात समाविष्ट केलं. पंजाबने अटीतटीच्या मुकाबल्यात फिरकीपटू युझवेंद्र चहलला सामील केलं. चहलसाठी पंजाबने तब्बल 18 कोटी रुपये मोजले.
डावखुरा वेगवान गोलंदाज या दुर्मीळ गटाचा प्रतिनिधी असलेल्या टी-20 वर्ल्डकप विजेत्या अर्शदीप सिंगसाठी पंजाब किंग्जने राईट टू मॅचचा अधिकार वापरला. लिलावात सलामी करणार्या अर्शदीप सिंगसाठी जोरदार लढाई रंगली. सनरायझर्स हैदराबादने 15 कोटींची बोली लावली. पंजाब किंग्जने राईट टू मॅचचा अधिकार वापरू असं स्पष्ट केलं.
अर्शदीप सिंगसाठी 18 कोटी देणार तयार असल्याचं पंजाबने स्पष्ट केलं आणि त्याची घरवापसी पक्की झाली. लिलावापूर्वी झालेल्या रिटेन्शनमध्ये पंजाब संघाने अर्शदीपला रिलीज केलं होतं. विकेट्स पटकावण्यात आणि धावा रोखण्यात माहीर अर्शदीपसाठी जोरदार बोली लागणार हे स्वाभाविक होतं. तसंच झालं. पंजाब दा पुत्तर अर्शदीपला संघात सामील करत पंजाबने आपला गोलंदाजीचा प्रमुख तोच असेल हे सिद्ध केलं. पंजाबने माजी कर्णधार ग्लेन मॅक्सवेलला संघात घेतलं आहे. अष्टपैलू मॅक्सवेलला सूर गवसल्यास पंजाबचं नशीब पालटू शकतं. नवीन प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांच्या पुढाकारामुळे पंजाबने अष्टपैलू मार्कस स्टॉइनसला संघात समाविष्ट केलं आहे. विदर्भवीर अष्टपैलू खेळाडू यश ठाकूर लखनौकडून पंजाबच्या गटात आला आहे. मुंबईसाठी दमदार कामगिरी करणार्या नेहल वढेराला पंजाबने आपल्याकडे ओढून घेतलं आहे.
नवा हंगाम नवे खेळाडू नवा कर्णधार आणि नवे प्रशिक्षक असं काम चालणारा संघ म्हणजे पंजाब किंग्सचा संघ. पंजाब किंग्सचा संघ आयपीएल 2025 पूर्वी नव्याने संघ बांधणी करणार आहे. पंजाबने रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये फक्त दोन खेळाडूंचा समावेश आहे. त्यामध्ये शशांक सिंग याला 5.5 कोटी आणि प्रभसिमरन सिंगला 4 कोटींना संघात कायम ठेवलं आहे. गेल्या काही हंगामात शिखर धवनने पंजाबचं नेतृत्व केलं. मात्र धवनने निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर पंजाब संघाला कर्णधारापासून सुरुवात करावी लागणार आहे. शेवटच्या लिलावात पंजाबाने सॅम करनसाठी तिजोरी रीती केली होती. सॅम करनने धवनला दुखापत झालेली असताना संघाचे नेतृत्वही केलं, पण त्याच्या लौकिकाला साधेचा त्याला खेळ करता आला नाही.
पंजाब किंग्सने या हंगामापूर्वी रिकी पाँटिंगला संघाचा नवा प्रशिक्षक म्हणून नेमलं आहे. आयपीएल 2025 च्या लिलावात पंजाबचा संघ रिकी पाँटिंगच्या मार्गदर्शनाखाली नव्याने संघ तयार करणार आहे. पंजाब किंग्सचा संघ 2025 च्या लिलावात 120 कोटींपैकी 110.05 कोटी अशा सर्वाधिक पर्ससह लिलावात उतरणार आहे. पंजाब संघाने दोनच खेळाडूंना रिटेन केल्यामुळे त्यांच्याकडे चार राईट टू मॅच कार्ड उपलब्ध आहेत. पंजाबच्या संघात हर्षल पटेल आणि सध्या टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक क्रिकेट घेणारा भारताचा वेगवान गोलंदाज असलेला अर्शदीप सिंगदेखील होता. त्यामुळे कदाचित संघ या दोन्ही वेगवान गोलंदाजांसाठी राईट टू मॅच कार्डचा वापर करेल.