। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
उत्तर प्रादेशिक येथील वाराणसीच्या कँट रेल्वे स्थानकच्या येथे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत 200 दुचाकी जळून खाक झाल्याच्या माहिती समोर आली आहे. रेल्वे कर्मचार्यांची वाहने उभी असलेल्या परिसरात ही आग लागली. मात्र, अग्निशमन दल आणि जीआरपी-आरपीएफने वेळीच घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. नाही तर आणखी मोठी दुर्घटना घडू शकली असती, असं बोललं जात आहे. ही घटना वाराणसीच्या कँट रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर असलेल्या जीआरपीच्या मागे असलेल्या रेल्वेच्या दुचाकी स्टँडवर घडली आहे. जिथे रेल्वे कर्मचारी त्यांची वाहने पार्क करतात, असं सांगितलं जात आहे.