। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबााग येथे शुक्रवारी (15 ऑक्टोबर) फिश-ऑन! टॅकल स्टोअरचा उद्घाटन सोहळा पार पडला. या स्टोअरचे उद्घाटन अलिबाग नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास रवी थोरात तसेच या दुकानाचे मालक पियुश वाकडे व त्यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलत असताना दुकानात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार केलेले मासेमारीसाठीचे सर्व साहित्य ठेवण्यात आले असून मत्स्यप्रेमींना आता अलिबागमध्येच हे साहित्य उपलब्ध होणार आहे. तसेच हे साहित्य भारतात तयार होत नसून या साहित्याची आवक बाहेरच्या देशांमधून केली जात आहे. अशी माहिती दुकानाचे मालक पियुश वाकडे यांनी दिली. तसेच हे दुकान व्यवसाय म्हणून नव्हे तर मासेमारी प्रेमींना अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले साहित्य उपलब्ध करून देऊन मिळणार्या आनंदासाठी सुरू केलं असल्याचेही त्यांनी सांगितले.