। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
मोहमद्द शमी शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी उपस्थित रहाण्याची शक्यता आहे. शमी सध्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धा खेळत असून त्याच्यावर मेडिकल प्रशिक्षक लक्ष ठेवून आहेत. त्याने चंदीगड विरूद्धच्या सामन्यात दमदार फकटेबाजी केली आहे.
घोट्याच्या शस्त्रक्रियेनंतर शमी प्रथमच रणजी ट्रॉफी स्पर्धेत मैदानावर उतरला होता. त्यानंतर त्याला पुन्हा पायाची समस्स्या उद्भवली होती. परंतु, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत शमी उल्लेखनीय कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. त्याने चंदीगडविरूद्ध फलंदाजी करताना जलद खेळी केली. बंगाल संघाने प्रथम फलंदाजी करत चंदीगडला विजयासाठी 160 धावांचे लक्ष्य दिले. ज्यामध्ये कोणत्याही फलंदाजाने मोठी खेळी केली नाही. सलामीवीर अभीषेक पोरेल 8 धावांवर बाद झाला तर, करन पालने 25 चेंडूत 33 धावांची खेळी केली. करन पाल व व्रितीक चटर्जी 21 चेंडूत 40 धावांची भागीदारी केली. चटर्जीने 12 चेंडूत 28 धावांचे योगदान दिले, तर प्रदिप्ता प्रामाणिकने 30 धावा केल्या. मोहम्मद शमीने 32 धावांची नाबाद खेळी करत बंगाल संघांसाठी 159 धावांचा टप्पा गाठला.