पुण्यातील धक्कादायक घटना
। पुणे । प्रतिनिधी ।
पुण्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका नवजात बालकाला जन्म देऊन आईने रस्त्यावर फेकले. त्यातही आणखी धक्कादायक म्हणजे बालकाच्या रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून चिमुकल्याच्या तोंडावर चक्क प्लास्टिकची पिशवी बांधण्यात आली होती.
एका नवजात बालकाला जन्म देऊन आईने चक्क रस्त्यावर सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरातील रेणुका नगरीत घडला आहे. बालकाच्या रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून चिमुकल्याच्या तोंडावर चक्क प्लास्टिकची पिशवी बांधण्यात आली होती. सोमवारी रात्री बाळाचा रडण्याचा आवाज आल्याने हा प्रकार उघडकीस आला. स्थानिकांनी याबाबत सिंहगड पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सिंहगड पोलिसांनी नवजात बालकाला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी, अज्ञात व्यक्ती विरोधात सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नवजात बालकाच्या पालकांचा शोधदेखील सिंहगड पोलीस घेत आहेत.






