दादर सागरी पोलीस स्टेशनमधील घटना
। पेण । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील दादर सागरी पोलीस स्टेशनमधील महिला कर्मचारी बंदूक साफ करत असताना अचानक गोळी सुटली. यात महिला कर्मचारी नूतन लाड यांच्या पायाला गोळी लागल्याने जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालय पेण येथे दाखल करण्यात आले आहे.
दादर सागरी पोलीस स्टेशनमधील महिला पोलीस कर्मचारी नूतन रामचंद्र लाड ह्या पोलीस स्टेशनमध्येच बंदूक साफ (सर्व्हिसिंग) करत असताना अचानक बंदुकीची गोळी सुटली. सदर गोळी ही नूतन लाड यांच्या पायाला घासून गेल्याने त्या जखमी झाल्या. त्यांना लगेच पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, दादर सागरी प्रभारी अधिकारी नागेश कदम आदींनी तात्काळ भेट दिली.