। रेवदंडा । प्रतिनिधी ।
चौल भोवाळे पर्वतवासी श्री दत्त जयंती परंपरेने उत्साहात साजरी केली जाते. यानिमित्ती चौल पाठारे क्षत्रीय पाचकळशी माळी समाजाच्यावतीने श्री दत्त मुखवटा पालखी सोहळा संपन्न झाला. गेली शंभर वर्षाच्या परंपरेने चौल भोवाळे श्री दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी श्री दत्त मुखवटा पालखी सोहळयाचे आयोजन करण्यात येते. यावेळी या मुखवटा पालखी सोहळ्याला चौल पाचकळशी माळी समाज बांधव मोठया संख्येने सामील झाले होते. परंपरेनुसार थेरोंडा पानसेवाडी दत्तात्रेय नाईक यांच्या घरातुन दत्त मुखवटा पालखीत बसवुन सकाळी 7 वाजता वाजत गाजत भक्तीभावाने श्री दत्त मदिंराकडे प्रस्थान करतात. यावेळी सुरेश घरत, रमेश म्हात्रे, प्रविण राऊत, अनंत घरत, वामन घरत, प्रपुल्ल मोरे, बलराम नाईक, मधुसुदन नाईक, नरेश म्हात्रे, सचिन कोटकर, विनोद कोटकर, सुभाष कोटकर, राकेश बेडेकर, बलराम म्हात्रे, अशोक घरत, उदय नाईक, संजय काबाळे, संजय नाईक व महिला उपस्थित होत्या.