| पनवेल | वार्ताहर |
पनवेल शहरातील जरीमरी गार्डनसमोर मोकळ्या मैदानाच्या रस्त्याच्या कडेला एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून, त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. या इसमाचे अंदाजे वय 50 वर्षे, डोक्याचे केस काळे, दाढी मिशी साधारण वाढलेली व काळी, बांधा सडपातळ, उंची अंदाजे 5 फूट 4 इंच आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे 022-27452333 किंवा सहा.पो.नि.सारिका झांजुर्णे यांच्याशी संपर्क साधावा.







