। ठाणे । प्रतिनिधी ।
शहापूर तालुक्यातील महत्वाची ग्रामपंचायत समजल्या जाणार्या चेरपोली-बामणे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदासाठी मंगळवारी (दि.17) झालेल्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे उप तालुकाप्रमुख सुनिल भेरे यांनी अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला आहे. उपसरपंच जगदीश पवार यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे हि निवडणूक घेण्यात आली होती. एकुण 15 सदस्य असेलेल्या या ग्रामपंचायतीत उपसरपंच या रिक्त पदासाठी चेरपोली ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या निवडणुकीत सुनिल भेरे यांना 9 तर कमल भोईर यांना 6 मते मिळाली. यावेळी सुनील भेरे यांची शिवसैनिकांनी मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला. सुनिल भेरे यांचे तालुकाप्रमुख बाळा धानके, विस्तारक गणेश राऊत, एकनाथ कोर, संदेश बोडवे, प्रशांत खर्डीकर, अनिल घोडविंदे, सचिन निचिते, कुमार भोईर यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले.