। सिंधुदुर्ग । प्रतिनिधी ।
सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक ओरोस शासकीय विश्रांतीगृह येथे संपन्न झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या मतदारांनी आपल्या पक्षाला मते दिली त्यांचा सन्मान राखणे आपली जबाबदारी आहे. त्यासाठी प्रत्येक नेत्याने, पदाधिकार्याने काम करून पुन्हा एकदा जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच, हिंदुत्व मुद्द्यावर शिवसेना पक्षाच्या बाबतीत विरोधकांनी केलेला अपप्रचार खोडून काढून शिवसेनेचा हिंदुत्वाचा विचार लोकांसमोर घेऊन जाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना, महिला आघाडी, युवासेना, विद्यार्थी सेना अधिक बळकट करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी उपनेते गौरीशंकर खोत, मा.आ. वैभव नाईक, राजन तेली, परशुराम उपरकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, संजय पडते, बाबुराव धुरी, सतीश सावंत, जान्हवी सावंत, नीलम पालव, श्रेया परब, मंदार शिरसाट, सुशांत नाईक, अमरसेन सावंत, मंदार केणी, चंद्रकांत कासार यांसह शिवसेना कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.