| पनवेल | वार्ताहर |
खारघर-तळोजा परिसरात भरवल्या जाणार्या आठवडा बाजारामुळे दुकानदारांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे पालिका हद्दीतील विनापरवानगी आठवडा बाजारावर तसेच अनधिकृत हातगाड्यांवर कारवाईचे लेखी निवेदन पालिका आयुक्त मंगेश चितळे यांना दिले आहे. त्यामुळे खारघरमधील दुकानदार आणि व्यापारी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. खारघर, तळोजा परिसरात सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर राजकीय कार्यकर्त्यांच्या आशीर्वादामुळे सेक्टरनिहाय मैदान आणि रस्त्यावर सातही दिवस आठवडा बाजार भरवले जात आहेत. या बाजारात घरगुती वस्तू, खेळणी, चप्पल, शोभेच्या वस्तू, कटलरी आदी वस्तू आणि भाजीपाला स्वस्त दरात मिळत असल्याने खरेदीसाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.