। खांब । वार्ताहर ।
रोहे तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब या शिक्षण संस्थेच्या चिल्हे येथील श्रमिक विद्यालयात क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.
या यहोत्सवातंर्गत विद्यार्थी वर्गाच्या सांघिक तसेच वैयक्तिक खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. तर शेवटच्या सत्रात विविध फनीगेम्स घेऊन या महोत्सवाची सांगता करण्यात आली. या महोत्सवाचे यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले. दरम्यान, संस्थेचे चेअरमन महेंद्र पोटफोडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या क्रीडा स्पर्धेत सर्वप्रथम सचिव कचरे व संचालक धनाजी लोखंडे यांच्या हस्ते क्रीडाज्योतीचे प्रज्वलन करून महोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक दिपक जगताप, नरेंद्र माळी, संजय आंधळे आदी मान्यवर उपस्थित होते.