। महाड । वार्ताहर ।
महाड येथील प्रतिथयश ओम साई इन्स्टिट्यूटच्या 12 वी विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा व निरोप समारंभ नुकताच बहुउद्देशीय हॉल, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे संपन्न झाला. या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य संभाजीराव सूर्यवंशी उपस्थित होते. त्यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाने समारंभाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने आणि सरस्वती वंदनेने झाली. यावेळी प्रा. महेश बागडे, प्रा. दत्तात्रय बामणे, प्रा. गंगावणे, प्रा. सोनावणे, प्रा. प्रीती जाधव, प्रा. एकता नाडकर, सावंत, हुंडेकर, तसेच 10 वी, 12 वी सायन्स, 12 वी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी या समारंभात उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्राचार्य संभाजीराव सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनासाठी योग्य दिशादर्शन केले.