| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत पोलीस ठाणे हद्दीमधील कर्जत शहरातील नात्याने पती-पत्नी असलेल्या दाम्पत्यांमध्ये परस्त्री आल्याने भांडणे होऊ लागली. परस्त्री आपली मैत्रीण आहे आणि तीदेखील याच घरात राहणार असे सांगून त्या परस्रीला घरात आणून ठेवणार्या नवरोबाने खर्या पत्नीला मारहाण करून भांडणे सुरु केली. दरम्यान, या प्रकरणात नंतर पहिल्या आणि लग्नाच्या पत्नीकडे माहेरून पाच लाखांची मागणी करून आर्थिक शोषण केल्याचा गुन्हा कर्जत पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
कर्जत पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 01/01/2020 रोजी 00:00 वा ते दि. 24/12/2024 रोजी 00:00 वा च्या दरम्यान मौजे विनायक अपार्टमेंट प्लॉट नं. 302 सुयोगनगर दहीवली येथील महिवूला यांनी आपल्या पती विरुद्ध कर्जत पॉलसीट टाकणारं दिली आहे. नात्याने पती पत्नी असून, त्यांचा दि.14/10/2013 रोजी प्रेमविवाह झाला आहे. त्यांना एक अपत्य मुलगी असून, ते एकत्र कुंटुबात राहात होते. तक्रारदार यांचे पती त्यांची प्रियसी यांचेसोबत प्रेमसंबंध ठेवून एकत्र राहात असल्याने त्या गोष्टीचा तक्रारदार यांनी विरोध केला असता या गोष्टीचा पतीने मनात राग धरून तक्रारदार यांना जेवण बनवता येत नाही, शिळं जेवण देते, मी तुझ्यासोबत राहणार नाही, तुला नांदवणार नाही, असे घालून पाडून बोलून तक्रारदार यांना शिवीगाळ करून हाताबुक्यांनी मारहाण करुन तसेच तक्रारदार यांना वडिलांनी घर घेण्यासाठी आधी साडेचार लाख रुपये दिले असताना देखील आणखी पैशांची मागणी करत होते. तसेच वारंवार हाताबुक्यांनी मारहाण करून शारीरिक मानसीक छळ जाच केला आहे. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास महिला पोलीस निरीक्षक घोलप करीत आहेत.