अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, वीटभट्टी व्यावसायिकांवर मोठे संकट
| खोपोली | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील सर्वच ग्रामीण भागात गेल्या 4 ते 5 दिवसापासून अवकाळी पावसाचं संकट सर्वांवर येऊन राहिले होते. यामुळे सर्वजण अवकाळी पावसामुळे वेगवेगळ्या विवंचनेत सापडले असता अखेर पावसाने हुलकावणी न देता अवकाळी पावसाने विजांच्या कडकडासह दमदार बरसात केली. तर या अवकाळी पावसामुळे सर्वांची तारांबळ उडाल्याचे पहावयास मिळाले असून, बाहेर फिरणाऱ्या प्रत्येक जण मिलेल त्या ओसरीला आसरा घेण्याचा प्रयत्न करत अवकाळी पावसापासून बचाव करत होता. त्यामुळे या अवकाळी पावसाने बहुतांशी उद्योगधंद्यांचे व उघड्यावर होणाऱ्या नागरिकांसह खेडेगावात राहण्याचे मोठे नुकसान करत अनेकांवर संकट आणून ठेवल्याने अनेक जण अवकाळी पावसामुळे त्रस्त झाले आहेत.
खालापुर तालुक्यातील ग्रामीण भागात आज शुक्रवारी सायंकाळी 4 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह दमदार बरसात केल्याने या अवकाळी पावसाने अनेकांना धक्काच दिला आहे. अवकाळी पाऊस पडल्याने वीटभट्टी व्यावसायिकांवर मोठे संकट आले आहे. अवकाळी पाऊस पडल्याने उकाड्यापासून खालापूरकरांना दिलासा दिला असला, तरी अनेकांचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच अचानक हजेरी लावलेल्या अवकाळी पावसाने खालापूर तालुक्याला चांगलेच झोडपून काढले असून, जोरदार वार्यासह अचानक आलेल्या पावसात भिजण्यापासून वाचण्यासाठी भंबेरी उडालेल्या नागरिकांनी मिळेल त्या छपराचा आसरा घेतला.