। पनवेल । वार्ताहर ।
राहत्या घरातून कोणास काही न सांगता एक इसम कुठेतरी निघून गेल्याने तो हरविल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
राहुल नातेश्वर सिंग (30 रा.डेरवली) असे या इसमाचे नाव असून वर्ण सावळा, केस बारीक, उंची 5 फुट 5 इंच, नाक गोलाकार चपटे, बांधा मध्यम, शिक्षण 10 वी असून अंगात मरुन रंगाचा फुल बाह्याचा शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, पायात सफेद रंगाचे बुट असून त्याला हिंदी व मराठी भाषा अवगत आहे. सोबत मोबाईल फोन आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती मिळाल्यास त्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाणे 022-27452444 किंवा 9594434999 व पो.ना.नितीन डगळे यांच्याशी संपर्क साधावा.