। बोर्लीपंचतन । वार्ताहर ।
अनेक ठिकाणी पंचक्रोशीत दवाखाने चालू होत असून बोगस डॉक्टर यांचाही सुळसुळाट वाढताना पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी बोर्ली पंचक्रोशीतील बोगस डॉक्टरमुळे महिलेच्या जीवास धोका निर्माण झाल्याचे घटना घडली होती. महिलेला गर्भपाताच्या गोळ्या दिल्याने अतिरक्तस्राव होऊन जीव धोक्यात आले असून डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. या आधीही अशा अनेक घटना घडल्याने श्रीवर्धन आरोग्य अधिकारी एस. के. नारायणकर यांच्यावतीने बुधवारी (दि. 02) दुपारी 12 वाजता पंचायत समितीमध्ये तालुकास्तरीय बोगस डॉक्टर शोध समिती श्रीवर्धन मार्फत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत तेहतीस डॉक्टरांनी उपस्थिती दाखवली होती. पंचायत समिती गटविकास अधिकारी एम.के. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व खाजगी डॉक्टरांची बैठक घेण्यात आली होती.
यावेळी विविध उपचार पद्धती संबंधित नियम तथा अधिनियमवर चर्चा करण्यात आली. बोगस डॉक्टर नेमके कुणाला ठरवणार याच्यावर विस्तारित माहिती दिली गेली. उपस्थित सर्व डॉक्टरांकडून संबंधित समस्यांवर चर्चा करण्यात आल्या. तसेच, वरिष्ठांकडून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी श्रीवर्धन आरोग्य अधिकारी यांच्याकडून उपस्थित डॉक्टर यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, डॉक्टर यांना वैद्यकीय व्यवसाय करायचे असल्यास कोणकोणत्या प्रकाराचे डिग्री व रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे. तसेच, डिग्रीला ऍलोपॅथी प्रॅक्टिस करायचे अधिकार (कितपत) आहे, दवाखान्यात पेशंट रजिस्टर ठेवणे, रिफर कधी व कुठे करावे तसेच बोडोशो समितीचे पुढचे पाऊल काय असेल या सर्व बाबींवर आरोग्य अधिकारी यांनी कार्यक्रमावेळी बैठकीत चर्चा केली.