। कर्जत । प्रतिनिधी ।
माथेरानमधील पर्यावरणप्रेमी राकेश कोकळे यांचा गोवा राज्यात सन्मान करण्यात आला. राकेश कोकळे यांनी मागील काही वर्षांपासून येथील माथेरानचे जंगलातील प्लास्टिक कचरा गोळा करून तो नगरपालिका मध्ये जमा करत असतात. पर्यावरणप्रेमी अशीच ओळख निर्माण करून आजपर्यंत गावातील बहुतेक ठिकाणी आपल्या मित्र परिवार सोबत जाऊन वेळप्रसंगी कड्याकपारीत स्वतः उतरून कचरा संकलित करतात. त्यात प्लास्टिक बाटल्या, रॅपर्स तसेच अन्य प्लास्टिकजन्य कचरा नियमितपणे गोण्यांमध्ये संकलन करून नगरपालिका सफाई कामगारांच्यामार्फत योग्य स्थळी हलविण्यात येतो. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन गोवा येथील लायन्स इंटरनॅशनल यांच्या वतीने माथेरानचे स्वच्छतादूत तथा धनगर समाजाचे अध्यक्ष राकेश विलास कोकळे यांचा सत्कार केला.







