| महाड | उदय सावंत |
आईकडे जाते सांगून सासरहून निघालेली विवाहित महिला शोध घेऊनही न सापडल्याने अखेर तिच्या पतीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवल्याची घटना महाड तालुक्यात नुकतीच घडली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, दिपाली दिनेश शिंदे (42),रा.साकडी, महाड, ही विवाहित महिला मंगळवारी (दि.10) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कोंढवा, जिल्हा पुणे याठिकाणी आपल्या आईकडे जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली होती. घरातून गेल्यापासून दिपालीचा संपर्क होत नसल्याने आणि नातेवाईकांसह इतर सर्वत्र शोधाशोध करूनही ती न सापडल्याने अखेर तिचे पती दिनेश पांडुरंग शिंदे (52), रा. साकडी, ता. महाड यांनी सोमवारी (दि.16) महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन पत्नी बेपत्ता झाल्याची रितसर तक्रार नोंदवली आहे. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली या महिलेचा शोध सुरू असून, ही महिला कोणास आढळून आल्यास पोलिसांशी 9423380063 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन एमआयडीसी पोलिसांमार्फत करण्यात आले आहे.







