| पाली/बेणसे | धम्मशील सावंत |
पेण तालुक्यातील बेणसे सिध्दार्थ नगर येथील गावाखाली असणाऱ्या एका शेत तलावात (सालडोली) पोहण्यासाठी गेलेले तीन तरुण बुडाल्याची घटना शुक्रवारी (दि.20) घडली. तरुण बुडाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. गावातील ग्रामस्थ, तरुण तातडीने शेत तलावावर पोहचले. मोठ्या शर्तीने त्यांना बाहेर काढण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, बुडालेले तरुण एकाच कुटुंबातील आहेत. त्यांची नावे जोहेब जाकीर अत्तर(17), मिझान जाकीर अत्तार (14), अश्फाक अली (16 ) अशी आहेत. या बुडालेल्या तरुणांना काही तरुणांनी बाहेर काढून तात्काळ रिलायन्स नागोठणे कंपनीच्या फॅमिली वेल्फेअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले. येथील डॉक्टर व स्टाफ ने शर्तीचे प्रयत्न करून प्राथमिक उपचार दिले. आणि पुढील उपचारासाठी संजीवनी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. दरम्यान शेतीवर जाण्यासाठी रस्ता नसल्याने बचाव कार्यात मोठे अडथळे आले. बुडालेल्या तरुणांना नागरिकांनी खांद्यावर उचलून बाहेर आणले. घटनेची माहिती मिळताच पेण तहसीलदार तानाजी शेजाळ व नागोठणे पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी रुग्णालयात दाखल झाले. यावेळी स्थानिक तरुणांनी तातडीने मदतकार्य केले. यावेळी नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.