| पाली/गोमाशी | वार्ताहर |
सुमेध खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव येथील संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शनिवारी (दि.28) शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच, मानव विकास कार्यक्रमांतर्गत मोफत सायकलचे वाटप देखील करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सुमेध खरै म्हणाले की, माझे आजोबा नामदेव खैरे यांनी जे शिक्षण रुपी वृक्ष लावले, त्या वृक्षाचे माझे वडील सुरेश खैरे यांनी वटवृक्षात रूपांतर केले. या विद्यालयात गरीब आणि गरजू आदिवासी विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर शिक्षण घेत आहेत. त्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास करण्यासाठी मी कायम कटिबद्ध राहीन, असे अश्वाशीत केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष सुरेश खैरे, नगरसेवक सुमेध खैरे, उपसरपंच मोरेश्वर खामकर, निखिल खैरे, ऋतुजा मेहता, साक्षी शिंदे, संभाजी ढोपे, प्रशांत जोशी, संतोष धटावकर, राहुल हुले, विनीत कर्णिक, सौरभ यादव, प्राचार्य बबन पालवे, शिक्षक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पंचक्रोशीतील नागरिक पस्थित होते.





