| पनवेल | प्रतिनिधी |
मुंब्रा येथून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना पनवेल-मुंब्रा मार्गावर आरएएफ चौकाजवळ घडली आहे. अनिकेत लक्ष्मण सपकाळ (28) हा तळोजा येथील धरणा कॅम्पमध्ये राहत होता. अनिकेत दुचाकीवरून कामावर जात होता. पनवेल-मुंब्रा मार्गावरील आरएएफ सिग्नलवरून जाताना मागून भरधाव ट्रकने त्याला धडक दिली. ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने ट्रक त्याच ठिकाणी सोडून पलायन केले. तळोजा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.







