| पनवेल | वार्ताहर |
अनोळखी व्यक्तीने गांजा आहे का असे विचारण्याचा बहाणा केला आणि 51 वर्षीय व्यक्तीच्या खिशातील रोख रक्कम, मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. त्याला प्रतिकार करत असताना त्याने खिशात असलेला वस्तरा काढून हातावर, नाकावर, डोळ्याच्या बाजूला वार केले. त्याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश छेडा हे पनवेल, नाडकर्णी हॉस्पिटल जवळ राहत असून, सोमवारी (दि.28) ते पनवेल रेल्वे स्टेशन येथे उतरून घरी जाण्यासाठी निघाले. ते एसटी डेपोकडे जाणाऱ्या रस्त्याने पायी चालत जात असताना एक अनोळखी व्यक्ती यांच्या जवळ आला आणि गांजा आहे का? असे विचारण्याचा बहाणा केला आणि त्यांच्या खिशातील रोख रक्कम आणि मोबाईल काढून घेतला. त्याला प्रतिकार करत असताना अनोळखी व्यक्तीने वस्तारा काढला आणि त्यांच्या शरीरावर वार करून त्यांना जखमी केले आणि तो झोपडपट्टीमध्ये पळून गेला. त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो सापडून आला नाही.







