| पनवेल | प्रतिनिधी |
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी पनवेल शहरातील दगडी शाळा येथील शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच वह्यावाटप करण्यात आले.
शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच वह्यावाटप करण्यात आले. यावेळी महिला उपशहर संघटिका उज्वला गावडे यांनी शिष्यवृत्तीकरिता 2500/- रुपये रोख दिले. या कार्यक्रमास महानगर प्रमुख अवचित राऊत, पराग मोहिते, प्रशांत नरसाळे, उदय धुमाळ, अमोल गोवरी, निखिल भगत, कुशल भगत, राजेश शेट्टीगार, मयुरेश पाटील आदींसह इतर पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







