| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबईच्या घणसोलीतील सिम्प्लेक्स परिसरात अपघाताची धक्कादायक घटना घडली. एका मद्यधुंद पोलिसाच्या भरधाव वाहनाने दुचाकीस्वाराला धडक दिली. या अपघाताचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसाकडून वाहन अतिशय निष्काळजीपणे चालवले जात होते. या पोलिसाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर पोलिसाने दुचाकीस्वाराला धडक दिली. पोलिसाच्या वाहनाने जोरदार धडक दिल्याने, दुचाकीस्वार रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झाला. माहिती मिळताच स्थानिक पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर या पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानंतर पोलिसाच्या वाहनात दारूच्या उघड्या आणि बंद बाटल्या देखील आढळल्या. यामुळे चालक मद्यधुंद अवस्थेत होता आणि कर्तव्यावर असताना दारू पित होता, असा संशय आणखी वाढला. सध्या पोलिसांनी अंतर्गत तपास सुरू केला आहे. स्थानिक रहिवाशांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. निष्काळजी आणि नियम मोडणाऱ्या पोलिसावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.







